Jalgaon Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: जळगाव हादरले! २८ महिन्यांत ५० चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, आरोपी नातेवाईकच असल्याचे उघड

Jalgaon Child Physical Assault Cases Latest Report: जळगावमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. नातेवाईकांकडूनच २८ महिन्यांत ५० चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • जळगावमध्ये २८ महिन्यांत ५० अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

  • बहुतांश आरोपी पीडितांचे परिचित, नातेवाईक किंवा शेजारी असल्याचे उघड

  • अनेक आरोपी सध्या जामिनावर बाहेर

  • जळगावमधील मुलांवरील अत्याचाराच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी समोर

संजय महाजन, जळगाव

राज्यामध्ये लहान मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आरोपी अल्पवयीन मुलांना टार्गेट करून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. काही घटनांनामध्ये लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या देखील केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या २८ महिन्यांत ४६ मुली आणि ४ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये गंभीर बाब म्हणजे या पीडित बालकांचे लचके तोडणारे दूरचे कुणी नाही तर बहुतांश परिचित असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण अशाच घटना आपल्या आजूबाजूला घडतात. या पार्श्वभूमीवर आता पालकांनीच सजग राहणे खूप गरजेचे आहे. कुणीही काका-मामा किंवा गल्लीतील नातेवाईक आपल्या मुलांना प्रलोभन देत असेल तर आपण काळजी घेणे अपेक्षित आहे. इतर वेळी घडणारी लैंगिक अत्याचारांची प्रकरणे प्रेमप्रकरण, लग्नाचे आमिष किंवा प्रलोभन देऊन करण्यात येणारे शोषण या गटात मोडतात. मात्र, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, गेल्या २८ महिन्यांत दाखल असलेल्या बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत परिचितांकडूनच हे गुन्हे घडल्याचे निष्पन्न झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

पीडितांचे वय -

७ वर्षांपेक्षा कमी वय : ११

१४ वर्षांपेक्षा कमी वय : १६

१७ वर्षांपेक्षा कमी वय : २३

सगळ्यात कमी वयाची पीडित : वय ३

संशयित आरोपी वय -

१४ वर्षे वय : २ संशयित

१७-१९ वय : १२ संशयित

२१-३० वय : २२ संशयित

३०-५० वय : ८ संशयित

६० व अधिक वय : ६ संशयित

सगळ्यात वयस्कर आरोपी वय : ७८

आरोपी निष्कर्ष-

ओळखीचा : २५

नातेवाईक : १०

शेजारी : १२

मित्र : १

स्कूल संबंधित : २

अज्ञात : ० (महत्त्वाचे)

घटना कुठे घडली?

शेजारच्या घरात: २८

शेतात: ११

कारमध्ये: १

व्हॅनमध्ये: १

खुल्या जागेत: ९

संशयित सध्या कुठे आहेत ?

जेलमध्ये : २२

शिक्षा झालेला: १ (५ वर्ष शिक्षा)

उरलेले जामिनावर बाहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT