जळगाव : जळगाव शहरातील रहिवासी भागांना व एमआयडीसीमधील उद्योग क्षेत्राला जळगाव मनपातर्फे अवाजवी घरपट्टी आकारणीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे (BJP) आज (ता. १३) महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. (jalgaon corporation news Unreasonable lease charges BJP Morcha on corporation)
जिल्हा महानगरतर्फे सकाळी दहाला भाजप जिल्हा कार्यालय वसंतस्मृती येथून मोर्चाला सुरवात झाली. तेथून महापालिका प्रशासन व सत्तेत असलेल्या शिवसेनेविरोधात (Shiv Sena) जोरदार घोषणा देऊन महापालिकेचा निषेध करण्यात आला.
वाढीव घरपट्टी रद्दची मागणी
जळगाव (Jalgaon) शहरातील नागरिकांनी वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ मोर्चा काढला. वाढीव घरपट्टीच्या निषेधा करत वाढीव घरपट्टी रद्दची मागणी केली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.