jalgaon corporation 
महाराष्ट्र

भाजप– शिवसेना समोरासमोर; महासभेत व्‍यासपीठावर उपमहापौरांच्‍या बसण्यावरून वादंग

भाजप– शिवसेनेचा महापालिकेत गदारोळ; उपमहापौरांच्‍या बसण्यावरून वादंग

संजय महाजन

जळगाव : महापालिकेतील उपमहापौर कुलभूषण पाटील यांना महासभेत व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आहे का? तसा नियम दाखवा असा मुद्दा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपस्थित केला. यानंतर सभेत चांगलाच गदारोळ झाला. यानंतर विरोधक भाजप व सत्‍ताधारी शिवसेनेचे सदस्‍यांमध्‍ये देखील वादंग झाल्‍याचे पाहण्यास मिळाले. (jalgaon-corporation-news-Controversy-over-Deputy-Mayor's-sitting-on-the-podium)

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जळगाव महापालिकेची (Jalgaon Municipal Corporation) सभा ऑनलाइन होत होती. तब्‍बल दोन वर्षांनंतर आज महापालिकेची ऑफलाईन महासभा झाली. आधीच्या तहकूब झालेल्या महासभेच्या पार्श्‍वभूमीवर आजची महासभा वादळी सुरु झाली आहे. सकाळी अकरा वाजता महासभेस प्रारंभ झाला. महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी व्यासपीठावर होते.

एकेरी उल्‍लेख अन्‌ शाब्दिक चकमक

जळगाव महापालिका महासभेत गदारोळ झाला. भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपमहापौर व्यासपीठावर बसू शकतात काय? असा प्रश्न उपस्थित केल्‍यानंतर उपमहापौर कुलभूषण पाटील व कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादात दोघांनी एकेरी शब्दात उल्लेख करत तोडपाणी केल्याचा आरोप देखील झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake VS Manoj Jarange : आम्ही काय बांगड्या भरल्यात का? जरांगेंना मुंबईत जाऊ देणार नाही, हाकेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil : ...तर मी सरकारही पाडू शकतो, मनोज जरांगेंची थेट धमकी

Ashnoor Kaur: बिग बॉसमधील सर्वात लहान सदस्य अशनूर कौरचं वय किती?

Online Fraud : बनावट लिंक पाठवून घातला गंडा; पिता पुत्राची १६ लाख रुपयांत फसवणूक

Maharashtra Live News Update: धाराशिवमधून १२ हजार गाड्या मुंबईकडे निघणार, ५० हजार मराठा बांधव आंदोलनात सहभागी होणार

SCROLL FOR NEXT