jalgaon corporation saam tv
महाराष्ट्र

भाजपला धक्‍का; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला धक्‍का; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

संजय महाजन

जळगाव : मनपातील भाजप नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेला पाठींबा दिला होता. मात्र कारवाईच्‍या भीतीने काही दिवसांपूर्वीच पुन्हा घरवापसी केली होती. मात्र आज चार नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. (jalgaon corporation news BJP Four corporators join Shiv Sena)

जळगाव महापालिकेत (Jalgaon Corporation) गेल्या काही महिन्यांपासून खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या इकडून- तिकडे उड्या सुरू आहेत. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने महापालिकेवर सत्‍ता काबीज केली. यानंतर जयश्री महाजन महापौर तर भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील हे उपमहापौर पदी विराजमान झाले. मात्र शिवसेना सत्तेत (Jalgaon) आल्यानंतर भाजपने खेळी करीत दहा बंडखोरांना आपल्याकडे परंत आणले. दहा नगरसेवक पुन्हा भाजपत गेल्याने शिवसेना (Shiv Sena) पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.

अखेर चार नगरसेवक शिवसेनेकडे

भाजपकडे (BJP) परत गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी सभागृह नेते ललित कोल्हे हे प्रयत्नशील होते. बंडखोर नगरसेवकांच्या ते कायम संपर्कात होते. अखेर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असून चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज (ता.१०) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधले आहे. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

SCROLL FOR NEXT