Jalgaon Corona News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Corona News : चोपडा शहरात कोरोनाचे २ संशयित; आरोग्य यंत्रणा अलर्ट

Jalgaon News :राज्यातील काही भागांत कोरोनाच्या नव्या विषाणू ‘जेएन-१’चे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून याच दरम्यान (Chopda) चोपडा शहरात दोन कोरोना संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या महिला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्या असता त्यांना सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसून (Jalgaon) आल्याने कोरोना टेस्ट केली असता ते रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. (Latest Marathi News)

राज्यातील काही भागांत (Corona) कोरोनाच्या नव्या विषाणू ‘जेएन-१’चे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील भुसावळ व जळगाव शहरात जेएन १ चे रुग्ण सापडले आहेत. याच दरम्यान चोपडा शहरातील दोन महिलांना सर्दी, ताप, खोकला जाणवत असल्याने (Jalgaon Corona Update) आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची रॅपिड चाचणी केली होती. या चाचणीत ते ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील चाचणीसाठी नमुने जळगावला 

चोपडा शहरातील या दोन्ही महिलांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, त्यांची प्रकृती स्थिर असून, सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यांची ऑक्सिजन लेव्हल सामान्य आहे. आता आरटीपीसीआर चाचणीसाठी त्यांचे नमुने जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. दोन रुग्ण संशयित सापडले असले तरी कोरोना विषाणूचा हा नवीन उपप्रकार जेएन- १ आहे की नाही, याची स्पष्टता होण्यास वेळ लागणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

SCROLL FOR NEXT