Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News : शेतजमिनीचा वाद, काकाचा त्रास असह्य; व्हाट्सअँपवर मॅसेज टाकून संपविले जीवन

Jalgaon News : जामदा शिवारात असलेल्या शेतीच्या वाटणीवरून दोन्ही काका व त्यांची मुले यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. या वादातून चरणसिंग याला मारून टाकण्याच्या धमक्या काकांकडून देण्यात येत होत्या.

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीवरून काका- पुतण्यामध्ये वाद सुरु होता. या वादात काकाकडून होणार त्रास असह्य झाल्याने पुतण्याने जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक चिठ्ठी लिहून ती व्हॉट्सअँप ग्रुपवर शेअर केली. त्यानंतर झाडाला दोरी बांधत गळफास घेतल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी येथील चरणसिंग जाधव (वय ४२) असे मृताचे नाव आहे. याबाबत मृत चरणसिंगचे भाऊ चेतन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या जामदा शिवारात असलेल्या शेतीच्या वाटणीवरून दोन्ही काका व त्यांची मुले यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. या वादातून चरणसिंग याला मारून टाकण्याच्या धमक्या काकांकडून देण्यात येत होत्या. दरम्यान न्यायालयातून निकाल लागल्यानंतर दोन्ही काकांची नावे सातबारा उताऱ्यावर लागली. त्यामुळे त्यांनी चरणसिंगला शेतात येण्यास मनाई केली. 

आत्महत्येपूर्वी भावाला केला फोन 

या होणाऱ्या त्रासाला कंटाळून चरणसिंग याने ३ जूनला रात्री आठ वाजेच्या सुमारास चेतन जाधव यांना करत दोन्ही काका व त्यांची मुले त्रास देत असून त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. तसेच रात्री दहाला चरणसिंगने काका व त्यांच्या मुलांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी व्हॅट्‌सपॲपवर टाकली. हा मॅसेज वाचून चेतन घाबरून त्याच्या शोधासाठी निघाला. 

पाच जणांवर गुन्हा दाखल 

चेतन व त्याच्या मित्रांनी जामदा शिवारात चरणसिंगचा शोध घेतला असता शेताच्या बांधावरील झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या खिशात चिठ्ठीही मिळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी काका वजेसिंग जाधव, शांताराम जाधव, प्रतापसिंग जाधव, जगदीश जाधव, किरण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT