Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: चाळीसगावात ११ किलोचे ड्रग्ज; मुद्देमालासह एकजण पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon Chalisgaon News : पोलिसांनी दुचाकी व मुद्देमाल अशा एकूण ८० हजार ३४० रुपयांच्या ऐवजासह पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : नाशिक येथील ललित पाटीलच्या ड्रग्ज प्रकरण राज्यभरात गाजत आहे. यानंतर (Chalisgaon) चाळीसगावमध्ये पोलिसांनी ११ किलोचे ड्रग्ज जप्त करत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेला तरुण हा भिवंडी येथील आहे. यामुळे आता हे ड्रग्ज कनेक्शन ललित पाटील प्रकरणाशी असल्याची चर्चा आहे. (Live Marathi News)

चाळीसगाव शहरातील मालेगाव रस्त्यावरील पुलाच्या खाली मोटारसायकलवरून संशयित आरोपी शेख मोहम्मद आरिफ उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय २३, रा. भिवंडी, ता. ठाणे, ह. मु. साठफुटी रोड, पॉवर हाउस, जिरेबाबा दर्ग्याजवळ, मालेगाव) हा संशयास्पदरीत्या फिरताना मिळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याच्याजवळची बॅग तपासली असता, त्यात सुमारे २० हजार ३४० रुपये किमतीचे पारदर्शक झिप पाऊच पिवळसर रंगाचे क्रिस्टल एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. त्याला पोलिसांनी दुचाकी व मुद्देमाल अशा एकूण ८० हजार ३४० रुपयांच्या ऐवजासह पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही कारवाई करणाऱ्या पथकात पोलिस निरीक्षक संदीप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, पोलिस कर्मचारी विनोद भोई, पंढरीनाथ पवार, राहुल सोनवणे, संदीप रमेश पाटील, नितीन वाल्हे, मुकेश पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे, महेश बागूल, संदीप बाळासाहेब पाटील, आशुतोष सोनवणे, वजन मापाडी हितेश जैन, छायाचित्रकार अनिकेत जाधव यांचा सहभाग होता. उपनिरीक्षक योगेश माळी व हवालदार विनोद भोई हे तपास करीत आहेत. दरम्यान, हे ड्रग्ज चाळीसगावात विकण्यासाठी आणले जात होते की अजून कुठे नेले जात होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT