crime Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: काठीनं फोडलं, दगडानं ठेचलं; अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूचं गूढ वाढलं; जळगावात 'त्या' रात्री काय घडलं?

Unidentified Person Found Dead Jalgaon News: जळगाव शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगाव शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीची काठी आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

जळगाव शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहताच परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवली जात असून, अज्ञात व्यक्तीला अमानुष मारहाण करून नंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी परिसरातील नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच चोपडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा सुरू केला. तसेच प्राथमिक तपासात व्यक्तीची काठी आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हा मृतदेह नेमका कुणाचा? त्या व्यक्तीची नेमकी कुणी हत्या केली? पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT