Bodwad Accident Saam tv
महाराष्ट्र

Bodwad Accident : लग्न घरात दुःखाचा डोंगर; पत्रिका वाटप करून परतताना मामा-भाच्याचा मृत्यू

Jalgaon News : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करून घरी दुचाकीने परत येत होते. बोदवड- भुसावळ रस्त्यावर बोदवडपासून आठ किमी अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघे जागीच गतप्राण झाले.

Rajesh Sonwane

बोदवड (जळगाव) : मुलीचे लग्न ठरल्याने घरात तयारी सुरु होती. पत्रिका वाटप करण्याची लगबग सुरु होते. (Jalgaon) दरम्यान निमंत्रण पत्रिका वाटप करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार मामा आणि भाच्याचा अज्ञात वाहनाच्या (Accident) धडकेत मृत्यू झाला. ही घटना ८ फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास घडली. (Tajya Batmya)

करंजी साळशिंगी जंगल परिसरात हा अपघात घडला. शिवाजी राजाराम काळबैले (वय ५०) व ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे नात्याने मामा-भाचा असून काळबैले यांच्या मुलीच्या (Marriage) लग्नाची पत्रिका वाटप करून घरी दुचाकीने परत येत होते. बोदवड- भुसावळ रस्त्यावर बोदवडपासून (Bodwad) आठ किमी अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघे जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळाली असता नगराध्यक्ष आनंदा पाटील, सुनील बोरसे यांनी रुग्णवाहिका घेत घटनास्थळ गाठले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८ दिवसांवर होते मुलीचे लग्न 
अपघातात मृत्यू झालेल्या  शिवाजी काळबैले यांच्या मुलीचा विवाह सोहळा १७ फेब्रुवारीला नियोजित होता. लग्न आठ दिवसांवर असल्याने घरात सर्व तयारी सुरु असताना वडिलांचाच मृत्यू झाल्याच्या घटनेने लग्नघरी शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूजमध्ये तासभरापासून EVM बंद

Taj Mahal: कोणाच्या जमिनीवर बांधला गेल्या ताजमहाल? पाहा कोण होचं जमिनीचा मालक?

Pune Police : वाहतूक कोंडीची कटकट मिटवण्यासाठी थेट आयुक्त रस्त्यावर उतरले, भल्यापहाटे घेतला आढावा

Office Snacks: ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? जंक फूड खाण्याऐवजी 'हा' पदार्थ कायम बॅगमध्ये ठेवा

मोठी बातमी! ३ की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी ? कोर्टात आज होणार फैसला

SCROLL FOR NEXT