Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : भरधाव कार पुलाच्या कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू

Bhusawal News : भुसावळ शहरातील महेशनगरात वास्तव्यास असलेले तथा मेडीकल व्यावसायीक राजेश सुरेश भंगाळे (वय ४२) हे जळगावकडून भुसावळकडे जात होते.

Rajesh Sonwane

जळगाव : महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कठड्यावर भरधाव वेगाने आलेली कार धडकली. भुसावळ शहरातुन गेलेल्या महामार्गावर हा (Accident) अपघात रात्रीच्या सुमारास घडला. या अपघातात (Bhusawal) भुसावळ शहरातील रहिवासी व औषध विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. राजेश सुरेश भंगाळे (वय ४२) असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे.  (Tajya Batmya)

भुसावळ शहरातील महेशनगरात वास्तव्यास असलेले तथा मेडीकल व्यावसायीक राजेश सुरेश भंगाळे (वय ४२) हे (Jalgaon) जळगावकडून भुसावळकडे जात होते. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने रेल्वे उड्डाण पूलावर त्यांची कार पुलाच्या कठड्यावर धडकली. या अपघातात राजेश भंगाळे हे गंभीर जखमी झाले. या नंतर त्यांना जवळच असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदर अपघाताची माहिती मिळताच राजेश भंगाळे यांचे मित्र परिवार घटनास्थळी आले. भुसावळ ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात प्रसन्न पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली. मृत राजेश भंगाळे याच्या पश्चात आई-वडील, बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खोबरं काढणं आता सोप्पं! साऊथस्टाईल १ सोपी टीप; सेकंदात फुटेल नारळ

Super Seeds: केस गळणे, कोंडा आणि मुरुमांमुळे वैतागलात? मग या ५ बियांचे फायदे वाचाच

Maharashtra Live News Update: पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

Harshvardhan Rane: 'मी माझ्या वडिलांना ५-६ पार्टनरसोबत…”; मराठमोळा अभिनेता हर्षवर्धन राणेचा धक्कादायक खुलासा

Vastu Tips: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

SCROLL FOR NEXT