Bhusawal Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Crime News: सोने– चांदीसह ३५ हजाराचा मुद्देमाल चोरीला

सोने– चांदीसह ३५ हजाराचा मुद्देमाल चोरीला

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत लहान हनुमान मंदिराजवळ गोलाणी कॉम्प्लेक्समधील (Jalgaon News) घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने रोख व सोन्या- चांदीचे ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याने (Police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

भुसावळ शहरातील संजय एकनाथ गोसावी यांच्या घरातून चोरी झाली आहे. भुसावळ (Bhusawal) शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचे सत्र सुरूच आहे. पोलिसांची रात्रीची गस्त संशयास्पद असल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविरुध्द उलटसुलट चर्चा सुरू आहे. १३ फेब्रुवारीला रात्री दहा ते १४ फेब्रुवारीच्‍या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार झाला आहे.

असा गेला मुद्देमाल

गोलाणी कॉम्प्लेक्स येथील घराचा लाकडी दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी वीस हजार रुपये रोख, तीन हजार रुपये किंमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे सात मणी, तीन हजार रुपये किंमतीचे १ ग्रॅम वजनाची सोन्यांची वाटी, नऊ हजार रुपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनांचे दोन चांदीचे कडे असे एकूण ३५ हजार रुपये किंमतीचे रोख रुपये व सोन्या- चांदीचे दागिने चोरून नेले. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून फिर्यादी संजय एकनाथ गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT