Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : वृद्धाने बँकेतून काढलेले १ लाख २५ हजार महिलांनी लांबवीले

Jalgaon News : अमळनेर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी बँकेतून १ लाख २५ हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर त्यांनी पैसे आणि कागदपत्र पिशवीत ठेवून बँकेतून बाहेर निघाले होते.

Rajesh Sonwane

जळगाव : बँकेत पैसे काढून निघालेल्या वृद्धाच्या पिशवीतून १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि कागदपत्र दोन महिलांनी चोरून नेल्याची घटना (Amalner) अमळनेरमध्ये घडली आहे. या प्रकरणी वृद्धाने पोलीसात (Police) तक्रार दिली आहे. (Latest Marathi News)

कळंबे (ता. अमळनेर) येथील बाबूलाल शंकरसिंग गिरासे (वय ६५) हे ११ मार्चला सकाळी अमळनेर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी बँकेतून १ लाख २५ हजार रुपयांची रक्कम काढली. (Jalgaon) त्यानंतर त्यांनी पैसे आणि कागदपत्र पिशवीत ठेवून (Bank) बँकेतून बाहेर निघाले होते. याच दरम्यान दोन महिलांनी बाबुलाल गिरासे यांना काही न समजू देता पिशवीत ठेवलेली १ लाख २५ हजार रुपयांची रोकड लांबविली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसात गुन्हा दाखल 
सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर बाबूलाल गिरासे यांनी दुसऱ्या दिवशी १२ मार्चला अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून दोन अज्ञात महिलांच्या विरोधात अमळनेर पोलीस (Amalner Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : वृषभसह 'या' ३ राशींना नशिबाची साथ; शनिवार ठरणार आनंदाचा, प्रत्येक कामात मिळणार यश

एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

SCROLL FOR NEXT