Jalgaon News saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : दुरुस्तीचे काम करत असताना अचानक निसटला ट्रॅक्टरचा जॅक; ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील बोरनार या गावातून जात असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा अचानक एक्सल तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर उलटून अपघात झाला

Rajesh Sonwane

जळगाव : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा एक्सल तुटला असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. यामुळे दुरुस्तीसाठी ट्रॉलीला जॅक लागलेला होता. मात्र हा जॅक निसटल्यामुळे ट्रॉलीच्या खाली दाबल्या गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरनार गावात घडली. 

एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील सोमनाथ गोरख कोळी (वय २०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील बोरनार या गावातून जात असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा अचानक एक्सल तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. दरम्यान ट्रॉलीचा एक्सल दुरुस्तीसाठी भातखेडा येथून मॅकेनिक सोमनाथ याला घेऊन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी दुपारी चारच्या सुमारास गावात आला. 

ट्रॅक्टरचा तुटलेला एक्सल दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी ट्रॉलीला जॅक लावून कामाला सुरुवात केली. मात्र काम सुरू असताना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक निसटला. यामुळे दुरुस्तीसाठी मदत करणारा सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेननंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मुलाला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT