Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : आईच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू; खेळत असलेल्या चिमुकलीला भरधाव रिक्षाने उडविले

Jalgaon News : बांधकामावरील कामगारांनी चिमुकलीला धडक देऊन पळालेल्या रिक्षाचे छायाचित्र काढले होते. हे छायाचित्र पोलिसांना दिले. यावरून फरार झालेल्या रिक्षा चालकाचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : घराच्या अंगणात खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाने धडक देत उडविले. यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव शहरातील मेहरूण परिसरात मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान अपघात झाल्यानंतर रिक्षा चालक फरार झाला आहे. 

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात घडलेल्या घटनेत मनीषा जयसिंग बारेला (वय ६) असे मृत बालिकेचे नाव आहे. चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील पावरा कुटुंब जळगावात कामानिमित्ताने आले होते. येथे ठेकेदार अहमद खान यांच्या बांधकाम साइटवर मजुरीचे काम करत होते. मेहरूणमधील बांधकाम ठिकाणी मनीषा ही आई व मामासह वास्तव्यास होती. बांधकामाच्या ठिकाणी कामाला जात असताना आई मुलीला देखील सोबत घेऊन जात होती. 

आईजवळ खेळत असताना रिक्षाने उडविले 

दरम्यान आई काम करीत असताना मनीषा रस्त्याच्या कडेला खेळत होती. याच वेळी सुसाट आलेल्या रिक्षा चालकाने तिला धडक देत उडविले. यात चिमुरडी रस्त्यावर फेकली गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर ठेकेदार अहमद खान यांनी चिमुरडीला उचलून जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. नंतर तिच्या आईने हंबरडा फोडून आक्रोश केला

रिक्षा चालक झाला फरार 

चिमुकलीला धडक दिल्यानंतर संबंधित रिक्षा चालक घटनास्थळावरून रिक्षा टाकून फरार झाला होता. यावेळी पोलिसांना नागरिकांनी छायाचित्रासह माहिती दिली. त्यावरून रिक्षा चालकाला संपर्क करण्यात आला. तर मारहाणीच्या भीतीने पळून गेल्याची कबुली रिक्षा चालकाने दिली आहे. दारम्यान मनीषाचे वडील देवसिंग यांचा काही वर्षांपूर्वी बस अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे तिची आई मुलीला घेऊन भावाकडे आली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT