Jalgaon Hit And Run Case:  Saamtv
महाराष्ट्र

Jalgaon Accident: जळगावमध्ये थरारक अपघात! भरधाव कारने ५ महिला, २ चिमुकल्यांना उडवलं; १ जागीच ठार

Jalgaon Hit And Run Case: कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडवले. यामध्ये दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव, ता. १९ जुलै २०२४

जळगावच्या मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ जुलै) सायंकाळी ६:३० वाजता घडली आहे. या दुर्घटनेत चार महिला जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर संतप्त जमावाने कार चालकाला बेदम चोप दिला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावच्या वेरूळ परिसरातील मंगलपुरी भागात काही महिला आपल्या घरासमोर अंगणात गप्पा मारत उभ्या होत्या. याचवेळी एक भरधाव कार त्यांच्या दिशेने आली. कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातातील कारचा चालक कार चालक पवन कैलास पाटील (वय 25) रा. सप्तशृंगी कॉलनी रामेश्वर कॉलनी मेहरूण जळगाव हा नवशिक्या असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवरच चांगला चोप दिला.

या अपघाताबाबत पोलिसांनी माहिती दिली असून कारवरील चालक तरुणाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नियंत्रण सुटल्यानंतर ब्रेक दाबण्याऐवजी तरुणाने रेसवर पाय ठेवला त्यामुळे कारचा वेग वाढला व या कारणे महिलांना धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचा पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT