Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : गावापासून काही अंतरावर जाताच मृत्यूने गाठले; दुचाकीला डंपरची धडक, एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Jalgaon News : तेजस हा गावातील त्याचे मित्र तुषार युवराज बिन्हाडे (वय १९) व अजय सपकाळे (वय २२) हे जळगावातील खानदेश बँड पथक येथे कामाला आहेत. लग्नसराई असल्याने त्यांचे रोज काम सुरु होते

Rajesh Sonwane

जळगाव : बँड पथकाला कामाला असलेले तिघेजण दुचाकीने कामानिमित्ताने जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. गावातून निघाल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ झालेल्या अपघातात तेजस सुनील बिऱ्हाडे (वय २१) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तेजस हा नशिराबाद येथे आई- वडील, भाऊ आणि बहीण यांचेसह वास्तव्यास होता. दरम्यान तेजस हा गावातील त्याचे मित्र तुषार युवराज बिन्हाडे (वय १९) व अजय सपकाळे (वय २२) हे जळगावातील खानदेश बँड पथक येथे कामाला आहेत. लग्नसराई असल्याने त्यांचे रोज काम सुरु होते. 

गावापासून काही अंतरावर जाताच अपघात 

दरम्यान १५ मे रोजी जळगाव येथे बँड पथकाचे काम करण्यासाठी तेजस बिऱ्हाडे, तुषार बिऱ्हाडे आणि अजय सपकाळे हे दुचाकीने नशिराबाद येथून ट्रिपल सीट निघाले होते. गावापासून काही अंतरावर आल्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेजण रस्त्यावर दूरवर फेकले गेले. या अपघातामध्ये तेजस बिऱ्हाडे याचा जागीच मृत्यू झाला. तर तुषार व अजय या गंभीर जखमी झाले होते. 

ग्रामस्थांची मदतीसाठी धाव 

दरम्यान अपघात झाल्याची माहिती गावात समजताच ग्रामस्थ अपघातस्थळी दाखल झाले. अपघातात जखमी तरुणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर तेजसचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अपघातातील डंपर आणि चालक नशिराबाद पोलिसांनी जमा केले आहे. तर या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आता 'या' IAS अधिकाऱ्याकडे; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंची एन्ट्री

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

SCROLL FOR NEXT