Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Jalgaon News : कांतिलाल राठोड व रवींद्र चव्हाण हे दोघे दुचाकीने शिरसोली कडून जळगावकडे कामानिमित्ताने येत होते.

Rajesh Sonwane

जळगाव : जळगावत कामानिमित्ताने येत असलेल्या दोघं मित्रांवर काळाने घाला घातला. समोरून येत असलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचे टायर फुटले व ते दोधे दहा फूट अंतरावर फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव- पाचोरा रस्त्यावर घडली. 

विटनेर गावातील कांतिलाल ऊर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४) आणि रवींद्र किसन चव्हाण (वय ३०) अशी अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. कांतिलाल राठोड व रवींद्र चव्हाण हे दोघे दुचाकीने शिरसोली कडून (Jalgaon) जळगावकडे कामानिमित्ताने येत होते. दरम्यान शिरसोली गावाजवळ समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती, की दुचाकीच्या पुढील चाकाचा स्फोट होऊन दोन्ही शॉकअप तुटले. या (Accident) अपघातात दुचाकीवरील कांतिलाल राठोड आणि रवींद्र चव्हाण जागीच ठार झाले.

कारचालक फरार 

सदर अपघातानंतर शिरसोली ग्रामस्थांनी धाव घेत दोन्ही दुचाकीस्वारांना तत्काळ जळगाव जिल्‍हा रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच विटनेर ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी आक्रोश केला. दरम्यान अपघातानंतर दुचाकीला धडक देणारा कारचालक न थांबता फरार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: माण-खटावमध्ये होणार काँटे की टक्कर; जयकुमार गोरेंना प्रभाकर घार्गेंचं आव्हान

Assembly Election: व्होट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध; देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला नोमानींचा ऑडिओ

Goddess Lakshmi : लक्ष्मी प्राप्तीसाठी फक्त खास 10 उपाय करा, तुमच्यावर सदा पैशांची कृपा राहील

Horoscope Today : आज काहींना गुंतवणुकीसाठी चांगला दिवस, तर कोणाचे पैसा वाया जाण्याची शक्यता; तुमची रास यात आहे का?

Uddhav Thackeray: स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

SCROLL FOR NEXT