Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : मधमाश्यांच्या हल्ल्याने नियंत्रण सुटून ट्रॅक्टर नदीत कोसळले; चालकाचा जागीच मृत्यू

Jalgaon News : मामीच्या दशक्रिया विधीसाठी ट्रॅक्टरमध्ये लाकडे भरून नांद्रा गावाकडे तापी नदीच्या रोडने येत होते. या दरम्यान दुपारी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला.

Rajesh Sonwane

जळगाव : ट्रॅक्टरमधून लाकडे घेऊन जातांना मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. यामुळे वेगात असलेल्या (Jalgaon) ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन्‌ ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळले. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टरच्या खाली दाबला जाऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. (Live Marathi News)

नांद्रा (ता. जळगाव) येथील वासुदेव गोपीचंद सपकाळे (वय ४५) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. दम्यान ८ फेब्रुवारीला दुपारी वासुदेव सपकाळे हे त्यांच्या मामीच्या दशक्रिया विधीसाठी ट्रॅक्टरमध्ये लाकडे भरून नांद्रा गावाकडे (Tapi River) तापी नदीच्या रोडने येत होते. या दरम्यान दुपारी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. अचानकच्या हल्ल्यामुळे त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट तापी नदीत (Accident) कोसळले.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हि घटना घडली यावेळी गावातील तरुण अजय सोनवणे नदीकाठावरील विहिरीजवळ काम होता. त्याच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी गावातील तरुणांसह नदीकाठी पोहोचले. त्यांनी ट्रॅक्टरच्या खाली दाबला गेलेल्या वासुदेव यांना बाहेर काढले. मात्र वासुदेव सपकाळे ट्रॅक्टर खाली दाबले गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT