Accident Saam
महाराष्ट्र

Accident : कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाताना काळाचा घाला, आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

Jalgaon road accident : जळगावच्या अजिंठा चौकाजवळ भीषण अपघातात आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. बोलेरोला वाचवताना दुचाकी टँकरखाली गेली; दोन विद्यार्थी जखमी झाले.

Namdeo Kumbhar

Jalgaon accident, ITI student death : जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि विचित्र अपघात घडला. विरुद्ध दिशेने अचानक आलेल्या बोलेरो वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील विद्यार्थ्यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट टँकरखाली आली. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर आणि एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

वरुण विजय सुरवाडे असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर पवन अनिल अडकमोल हा या अपघातात अतिगंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. नीरज रवींद्र कोचुरे हा विद्यार्थी या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.

कॉलेज सुटल्यानंतर भुसावळकडे जाताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, वरुण, पवन आणि नीरज हे तिघेही जळगाव येथील शासकीय आयटीआयचे (ITI) विद्यार्थी होते. आज संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीने जळगावहून भुसावळच्या दिशेने निघाले होते. ट्रान्सपोर्ट नगर परिसरात आल्यानंतर समोरून अचानक एक बोलेरो गाडी विरुद्ध दिशेने आली. त्या वाहनाला पाहून दुचाकीस्वाराचा ताबा सुटला अन् त्यांची दुचाकी बाजूने जाणाऱ्या टँकरखाली घुसली.

नातेवाइकांचा आक्रोश, एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून वरुण सुरवाडे याला मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन रस्तनावरील वाहतूक सुरळीत केली. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालयाच्या परिसरात त्याच्या नातेवाइकांनी आणि वर्गमित्रांनी मोठा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

Pelvic floor exercises: प्रसूतीनंतर लघवीवर नियंत्रण राहत नाही? गर्भावस्थेत केलेला हा सोपा व्यायाम ठरू शकतो फायदेशीर

Maharashtra News Live Update: नागपूर- गोधनी गॅस गळती घटनेच्या प्रकरणाची चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीची स्थापना

SCROLL FOR NEXT