Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : सुसाट वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, एकजण जखमी 

Jalgaon News : काम आटोपल्यानंतर दोघेही मित्र दुचाकीने सायंकाळी पाचच्या सुमारास जळगाव शहराकडे येण्यासाठी निघाले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दुचाकीला भरधाव वेगाने  गाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अन्य एक जण जखमी झाला आहे. हा अपघात जळगाव तालुक्यातील वावडदा गावाजवळ घडला. यामुळे मार्गावरील वाहतूक खालंबली होती.

जळगावच्या (Jalgaon) जामनेर तालुक्यातील वाकोद येथील पवन वैजनाथ मंगरूळे (वय २५) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान गावातील राहुल ऊर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे (वय २५) याच्यासह पवन हा १ एप्रिलला वावडदा येथे आला होता. येथील काम आटोपल्यानंतर दोघेही मित्र दुचाकीने सायंकाळी पाचच्या सुमारास जळगाव शहराकडे येण्यासाठी निघाले. याच दरम्यान म्हसावद गावापुढे भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 

जोरदार धडक दिल्याने दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात पवन मंगरूळे याचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल ऊर्फ शुभम सोनवणे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर (Accident) दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. तेथे प्रथमोपचार झाल्यावर राहुल याला खासगी रुग्णालयात हलवले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT