Shambhuraj Desai On Manoj Jarange Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरु! सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवालीत जाणार

Manoj jarange Patil Maratha Reservation Protest: लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे दिसत आहे. ८ जूनपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेदुमत उपोषण सुरू केले आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे, जालना|ता. १३ जून २०२४

सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असल्याचे दिसत आहे. आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या असून आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यामध्ये दाखल होणार आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे दिसत आहे. ८ जूनपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेदुमत उपोषण सुरू केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून जरांगेंचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अशातच त्यांनी जोपर्यंत सरकार ठोस भूमिका घेणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

मनोज जरांगे पाटलांच्या या इशाऱ्यानंतर त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मंत्री शंभूराज देसाईंचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सोडावे या संदर्भात शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

दरम्यान, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांची रात्री भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच राज्यातील सर्व खासदारांना सोबत घेऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT