Jain Muni Nileshchandra Swami announcing the Pigeon Welfare Party ahead of Mumbai municipal polls. Saam Tv
महाराष्ट्र

Jain Community: कबुतरांच्या हाती पालिकेच्या चाव्या? जैन समाजानं वाढवलं भाजपचं टेन्शन

Impact of Pigeons On Mumbai Municipal Election: आता मुंबई महापालिकेची सत्ता कबुतरं ठरवणार आहेत...कारण कबुतरांवरुन टोकाचं राजकारण रंगलंय.. मात्र मुंबईत जैन समाजाची किती प्रभागांमध्ये निर्णायक भूमिका आहे? आणि जैन समाजाने सुरु केलेल्या कबुतरांच्या कल्याणासाठीच्या पक्षाचा कुणाला फटका बसणार?

Omkar Sonawane

मुंबई महापालिकेच्या चाव्या आता कबुतरांच्या हाती जाणार आहे.. कारण अहिंसेचा मंत्र जपणाऱ्या जैन मुनींनी थेट माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कबुतरांसाठी राजकीय आखाड्यात उडी घेतलीय.. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जैन मुनी निलेशचंद्र स्वामींनी कबुतराच्या मुद्द्यावर शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा केलीय.. तर एवढंच नाही तर कबुतर या पक्षाचं चिन्हं असल्याचंही जाहीर केलंय.. त्यावरुन आता राजकारण तापलंय..

हे जैन मुनी शांतीसभेत एवढ्यावरच थांबले नाहीत... तर जैन समाज मुंबईत सगळ्यात जास्त टॅक्स भरत मराठी माणसांना कमी लेखणाऱ्या वल्गनाही केल्या आहेत... मनसेनं याचा चांगलाच समाचार घेतलाय.. खरं तर मुंबईत 52 कबुतरखाने आहेत. या कबुतरांच्या विष्ठेमुळे न्युमोनिटिस आणि क्रिप्टोकोकोसिससारखे श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत... त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतलाय.. मात्र न्यायालयाच्या आदेशाला धुडकावणाऱ्या जैन समाजानं थेट महायुती सरकारला अल्टिमेटम देत नव्या पक्षाची घोषणा केलीय.. मात्र त्याचा आगामी महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे?

खरंतर 227 प्रभागांच्या मुंबई महापालिका परिसरात जैन समाजाची 4.10 टक्के तर गुजराती समाजाची 11 टक्के लोकसंख्या आहे... त्यामुळे जैन समाजाचा 25 प्रभागात तर गुजराती समाजाचा 40 प्रभागांमध्ये प्रभाव आहे.. यात घाटकोपर, मुलुंड, अंधेरी, विलेपार्ले, बोरीवली, कांदिवली, मलबार हिल भागात जैन व गुजराती समाजाचा प्रभाव आहे...

आतापर्यंत जैन समाज भाजप, शिंदेसेनेचा पारंपरिक मतदार राहिला आहे... त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जैन समाजानंच सरकारला अल्टिमेटम दिल्यानं व्होट बँक कायम ठेवण्यासाठी सरकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार की कबुतरखाने बंदीचा निर्णय कायम ठेवणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र हे असं असलं तरी आता कबुतर मुंबई महापालिकेचा सत्ताधीश ठरवणार का? याचीही चर्चा रंगलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...

Dahi Vada Recipe: साऊथ इंडियन स्टाईल दही वडा कसा बनवायचा?

Jio Cheapest Plan: जिओ यूजर्ससाठी खुशखबर! कमी किमतीत २८ दिवसांचे पाच बेस्ट रिचार्ज प्लॅन्स, किंमत किती?

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना, काम कसं करणार?

SCROLL FOR NEXT