Maharashtra : महाविद्यालये सुरु करण्याची वेळ आली आहे : उदय सामंत Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra : महाविद्यालये सुरु करण्याची वेळ आली आहे : उदय सामंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून महाविद्यालये सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज अमरावती येथे सांगितले.

अरुण जोशी

अमरावती : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राज्यातील महाविद्यालये कधी सुरु होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. यावरच प्रतिक्रिया देताना, महाविद्यालये सुरु करण्याची वेळ आता आली असून ज्या जिल्ह्यांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, अशा जिल्हांमध्ये टास्क फोर्स आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून महाविद्यालये सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज अमरावती येथे सांगितले.

हे देखील पहा :

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातर्फे राबविण्यात आलेल्या 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ अमरावती' या उपक्रमासाठी ते अमरावती येथे आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली.

महाविद्यालये सुरु करण्यापूर्वी प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली असून प्रत्येक विभागातील कोविडची नेमकी परिस्थिती लक्षात घेऊन किती प्रमाणात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावू शकतो तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राचार्य आणि इतर सहयोगी कर्मचारी यांचे लसीकरणाची काय परिस्थिती आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच महाविद्यालय सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT