NCP, Chhatrapati Sambhaji Nagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bike वरुन आले अन् नवरदेवावर हल्ला चढविला, ISRO चे वरिष्ठ शास्त्रज्ञ गंभीर जखमी

आज दुपारच्या सुमारास हाेते लग्न.

राजेश काटकर

Parbhani News : स्वत:च्या लग्न समारंभासाठी परभणी येथे येत असताना तिघांनी परभणी वसमत रोडवर राहटी नदी पुलावर वाहन अडवून तिघांनी नवरदेवासह त्याच्या कारवर सहा जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात वैज्ञानिक पंकज प्रकाश कदम (pankaj prakash kadam) हे गंभीर जखमी झाले. कदम हे इस्रोचे (isro) वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. (Maharashtra News)

पंकज प्रकाश कदम हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यामधील उमेरखेड तालुक्यातील मुळावा येथील आहे. पंकज यांचा विवाह परभणी येथील वसमत रोडवरील शिवराम नगरात वास्तव्यास असणा-या एका कुटुंबात ठरला. आज (मंगळवार, ता. ९) दुपारी १२.३० वाजता एका मंगल कार्यालयात हे लग्न होणार होते.

या लग्नासाठी पंकज कदम हे आपल्या परिवारासह ८ मे रोजी परभणीला येत होते. दुपारच्या सुमारास त्यांचे वाहन राहटी पुलावर आले असता मोटार सायकलवर आलेल्या सहा जणांनी पंकज यांचे वाहन थांबवले.

काही कळण्याच्या आत हल्लेखोरांनी पंकज यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉडने जबर मारहाण केली. त्यांच्यामध्ये येणाऱ्यांनाही हल्लेखोरांनी धमकी दिली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले.

या हल्ल्यात पंकज कदम हे जखमी झाले. त्यांना उपाचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान चार ते पाच दिवसांपूर्वी पंकज कदम यांच्यावर नांदेड (nanded) येथील रेल्वे स्टेशनजवळ हल्ला झाला होता. त्यानंतर परभणी येथे लग्नाला येत असताना पुन्हा त्यांच्यावर हल्ला झाला. यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवून काेणी तरी हल्ला घडविल्याचा संशय पाेलिसांना आहे.

दरम्यान परभणीचे उपविभागीय यशवंत काळे, अधिकारी राजेंद्र शिरतोडे, स्थानिक गुन्हा शाखेचे (lcb) पथक तसेच तहसिलदार गणेश चव्हाण यांनी कदम यांची भेट घेतली. या हल्ल्याचा तपास पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT