Sangli News, islampur police saam tv
महाराष्ट्र

Islampur Police News : इस्लामपूरात आंतरराज्य टोळीतील चाैघे अटकेत, बॅग, चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे उघडकीस

Sangli Crime News : इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलिसांनी पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चार जणांना नुकतीच अटक केली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसेल अशी चर्चा हाेऊ लागली आहे.  (Maharashtra News)

इस्लामपूर मधील सुभाष गोपाळ पाटील हे आझाद चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या इस्लामपूर शाखेतून ५० हजार रुपये रक्कम काढून बाहेर आले. कापडी पिशवीत ती रक्कम गुंडाळून सायकलच्या कॅरेजला लावली.

घरी जात असताना मोटरसायकल वरील एका अनोळखी इसमाने त्यांच्या आडवी गाडी मारली व त्याचदरम्यान पाठीमागील एका अनोळखी इसमाने पिशवी काढून घेऊन ते दोघे मोटरसायकलवरून पळून गेले हाेते.

दरम्यान पाेलिसांनी (police) तपास करताना बँकेच्या समोरून नागरिकांच्या पैशाची बॅग बळवणाऱ्या ओडिसामधील आंतरराज्य टोळीतील चार जणांना पकडले. इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

बॅग व चेन स्नॅचिंगसारख्या आठ गुन्ह्यांची कबुली संशयित चाैघांनी दिल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्यांच्याकडील ४ लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. नानी सिबा नागरोळ एम. रायडू , संतोष रामू औल व रोहित गोपाल प्रधान अशी पोलिसांनी अटक (arrests) केलेल्या संशियतांची नावे आहेत..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: सोमवारपासून या ३ राशींचे नशीब चमकणार, पैसा अन् प्रेमाचा वर्षाव होणार

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

Soft Idli Recipe: इडली फुगतच नाही? बॅटरमध्ये घाला '१' पदार्थ, सॉफ्ट - साऊथ स्टाईल इडलीचं सिक्रेट

BSNL Prepaid Plan: स्वस्तात दमदार ऑफर! बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा दररोज 2.5GB डेटा आणि अनेक फायदे

Rule Change : १ ऑक्टोबरपासून ५ नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा काय होणार बदल

SCROLL FOR NEXT