Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना परळी (parli) बीड (beed) येथे काही दिवसांपुर्वी न्यायालयात दिलासा मिळाला हाेता. दुसरीकडे शुक्रवारी सांगली जिल्ह्यात मात्र अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयातील (court) निकालावरुन मनसैनिकांसह (mns) राज ठाकरेंना झटका बसला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दाखल केलेला दोषमुक्ती अर्ज इस्लामपूर न्यायालयात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. हा अर्ज नामंजूर झाल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. (Maharashtra News)
शिराळा (Shirala) तालुक्यातील शेंडगेवाडी येथे २००८ मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. यावेळी दगडफेकही (stone pelting) झाली. सरकार पक्षाच्यावतीने याप्रकरणी ठाकरे, मनसे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत (tanaji sawant) व अन्य यांच्याविरुध्द कोकरुड पोलीस (kokrud police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिराळा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
राज ठाकरे यांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्याची विनंती वकिलामार्फत इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. सरकारी वकिल राजेश पाटील यांनी युक्तीवाद करीत असताना अद्याप साक्षीदारांचे जबाब नोंदविले नाहीत असे सांगत दोषमुक्तीला विरोध दर्शवला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ठाकरे यांची प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती अमान्य केली. या निर्णयाने मनसैनिकांना (Maharashtra Navnirman Sena) धक्का बसला आहे. आता आगामी काळात राज ठाकरेंना या प्रकरणातून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.