Invitation letter of samruddhi highway Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची नावं नाहीत; भाजपकडून कार्यक्रम हायजॅक?

Samruddhi Mahamarg Inauguration News: अजित पवार आणि अंबादास दानवे यांची नाव वगळण्यात आल्याने हा कार्यक्रम भाजपने हायजॅक केला का? असा सवाल उपस्थित होत आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Samruddhi Mahamarg News: नागपूर-मुंबई या बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण 11 डिसेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे. या निमंत्रण पत्रिकेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव नसल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचंही नाव आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. (Nagpur Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, या निमंत्रण पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोज सौनिक,भा.प्र.से. अप्पर मुख्य सचिव (सा.बां), राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक , भा.प्र.से. (नि.) अशी नावं आहेत.

सोबतच लोकसभा सदस्य कृपाल तुमाने, मा. विधान परिषद सदस्य ना. गो. गाणार, प्रविण दटके अॅड. अभिजीत वंजारी, श्री चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा सदस्य अनिल देशमुख, सुनिल केदार, समीर मेघे, आशिष जयस्वाल, राजु पारवे, टेकचंद सावरकर, मुक्ताताई कोकट्टे (अध्यक्षा, जिल्हा परिषद, नागपूर) आणि मनु कुमार श्रीवास्तव, भा.प्र.से. (मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य) इत्यादी नावे आहेत. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची नाव वगळण्यात आल्याने हा कार्यक्रम भाजपने हायजॅक केला का? असा सवाल उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पहिल्या टप्प्यांचे लोकार्पण

देवेंद्र फडणवीस यांचे स्वत: या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष देत होते. दर टप्प्याला आणि गतिमान आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जायचा. संपूर्ण राज्यासाठी विकासाचे नवे दालन खुले होणार आहे.

महामार्ग हा सहा पदरी असून मार्ग/150 कि.मी. वेगाने वाहन क्षमता असणार आहे. सध्या नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्ण झाला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येणार आहे. उर्वरित 181 कि.मी. महामार्ग हा पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. (Maharashtra News)

पर्यटनाला चालना मिळणार

महामार्गाला राज्यातील १४ जिल्हे पोर्टने जोडले जाणार आहेत. प्रतिदिवशी 30 ते 35 हजार वाहने धावणार आहेत. महामार्गामुळे शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता, एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

या मार्गावर 9 ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा/20 इंधन स्टेशन्स रस्त्याच्या लगत असणार आहे. 18 कृषी समृद्धी केंद्रांची या महामार्गाभोवती निर्मिती होणार आहे. या महामार्गाला जोडून दुष्काळी भागात 1000 नवीन शेततळी/चेकडॅम्स उभारले जाणार आहेत. (Samruddhi Mahamarg

या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार आहे. सर्वाधिक गतीने पूर्ण भूसंपादन या महामार्गावर झाले. 8800 हेक्टर जागा ही सर्वाधिक गतीने भूसंपादन करण्यात आली. अवघ्या 12 महिन्यात भूसंपादन करण्यात आली. यासाठी 8003.03 कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले. या महामार्गाच्या उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गवर ट्रायल घेतली. नागपूर (Nagpur) ते शिर्डीपर्यंत त्यांनी एकत्र प्रवास केला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

SCROLL FOR NEXT