Kolhapur News Ranjit majgaonkar
महाराष्ट्र

Kolhapur News: अखेर न्याय मिळला; नराधम भावांना आजन्म कारावासाची शिक्षा

बहिणीने आंतरजातीय विवाह केला आहे या गोष्टीने मेघाचे भाऊ फार अस्वस्थ झाले होते.

साम वृत्तसंथा

Kolhapur News: आंतरजातीय विवाहाला आजही अनेक ठिकाणी विरोध केला जातो. सैराट या चित्रपटानंतर फिल्मी स्टाईलने प्रेमी जोडप्यांची हत्या करण्याच्या घटना बऱ्याच ठिकाणी घडल्या. अशीच एक घटना पन्हाळा तालुक्यात घडली होती. यात दोन भावांनी आपल्या सख्ख्या बहिनीचा आणि तिच्या पतीचा जीव घेतला होता. मात्र शुक्रवारी न्यायालयाने या नराधमांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली असून जोडप्याला न्याय दिला आहे.

पन्हाळा तालुक्यात साल २०१५ साली ही घटना घडली होती. आता तब्बल ७ वर्षांनी त्यांना न्याय मिळाला आहे. या प्रकरणात आरोपींविरोधातील पुरावे देखील नष्ट करण्यात आले होते. मात्र सर्व अडचणी मागे टाकत न्यायालयाने (Court) दिलेल्या या निकालामुळे सर्वच प्रेमी युगल सुखावले आहेत. या घटनेत हत्या झालेल्या मुलीचे नाव मेघा पाटील असे आहे.

मेघाचा प्रियकर आंतरजातीय असल्याने तिच्या कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध केला होता. त्यामुळे ती लग्नानंतर कसबा बावडा येथे आपल्या पतीबरोबर राहत होती. दोघांनी कुटूंबापासून दूर जाउन नविन आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र त्यांचा हा सुखी संसार इतक्या निर्घृणपणे भंगणार आहे याची त्यांना काहीच क्लपना नव्हती.

बहिणीने आंतरजातीय विवाह (Marriage) केला आहे या गोष्टीने मेघाचे भाऊ फार अस्वस्थ झाले होते. बहिणीमुळे त्यांचा मोठा संताप झाला होता. त्यांचा राग इतका वाढला होता की, त्यांनी सख्ख्या बहिणीचा शोध घेत तिच्यासह प्रियकर पतीच्याही नरडीचा घोट घेतला. त्यांनी मेघा आणि तिच्या पतीवर धारधार शस्त्रांनी वार केले होते. गणेश पाटील आणि जयदीप पाटील अशी या दोन भावांची नावे आहेत. दोघांनी केलेल्या कृत्यामुळे आता त्यांना आजन्म कारावास भोगावा लागणार आहे.

या संदर्भात न्यायालयात एकूण सात वर्षे सुनावणी सुरू होती. दरम्यान नितीन काशीदने आरोपी गणेश आणि जयदीप या दोघांना सोडवण्यात त्यांची मदद केली होती. यासाठी त्याने कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागण्याआधीच तो नष्ट केला. त्यामुळे न्यायालयाने त्याला देखील शिक्षा सुनावली आहे. पुरावे नष्ट केल्याने नितीन काशीदला ३ वर्षे ६ महिने अशी सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santa claus: सांताक्लॉजचं खरं नाव माहितीये काय?

Actress Success: 'या' अभिनेत्रीला दोन वेळचं जेवणही परवडत नव्हत; आज आहे इतक्या कोट्यवधी मालकीण

16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी; कोणत्या सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय?

New Year 2026 Trip : हिरवीगार वनराई अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, 'हे' आहे न्यू इयर ट्रिपसाठी परफेक्ट लोकेशन

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २० दिवस, eKYC न करणाऱ्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार नाहीत? अधिवेशनात काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT