संभूखेड गावच्या सुपुत्राला राजस्थान मध्ये वीरमरण Saam Tv
महाराष्ट्र

संभूखेड गावच्या सुपुत्राला राजस्थान मध्ये वीरमरण

माण तालुक्यामधील संभूखेड गावचे जवान सचिन विश्वनाथ काटे (वय- २४ ) यांना देशसेवा बजावत असताना राजस्थान या ठिकाणी वीरमरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाई : माण तालुक्यामधील संभूखेड गावचे जवान सचिन विश्वनाथ काटे (वय- २४ ) यांना देशसेवा बजावत असताना राजस्थान या ठिकाणी वीरमरण आले आहे. या घटनेमुळे माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. संभूखेड या ठिकाणी जवान सचिन विश्वनाथ काटे यांना देशसेवा बजावत असताना राजस्थानमध्ये बुधवारी २०ऑक्टोबर दिवशी रात्री वीर मरण आल्याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली होती.

हे देखील पहा-

५ वर्षापुर्वी सचिन काटे भारतीय सेनेत भर्ती झाले होते. त्यांचा लहान भाऊ देखील रेवन विश्वनाथ काटे हा लहान भाऊ आसाम या ठिकाणी देशसेवा बजावत आहे. आई- वडिल हे गावी शेती करतात. सचिन काटे यांना वीर मरण आल्याची माहिती मिळताच माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या मागे आई- वडील आणि लष्कर सेवेत असलेले भाऊ असा परिवार आहे. सचिन काटे यांचे पार्थिव पुणे येथील लष्कराचे जवान घेऊन येत असून, आज शनिवारी संभूखेड या जन्म गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT