Grieving grandfather holds the body of his two-month-old granddaughter overnight outside a government hospital in Jalgaon after alleged medical negligence. saam tv
महाराष्ट्र

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

Infant Death After Vaccination In Jalgaon Hospital: जो बाप सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहे त्याच बापाच्या अडीच महिन्यांच्या लेकीचा मृतदेह आजोबांना रात्रभर मांडीवर घेऊन बसावं लागलं...महाराष्ट्राला लाज आणणारं हे चित्र जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातलं आहे. लस दिल्यानंतर मृत्यू झालेल्या या चिमुकलीची कशी हेळसांड झाली? त्यावरचा हा खास रिपोर्ट...

Saam Tv

सचिता दीपक बोरसे... अवघ्या अडीच महिन्यांचं हे गोंडस बाळ. जिल्हा परिषद शाळेत आयोजित लसीकरण मोहिमेदरम्यान सचिताला पोलिओ आणि पेंटा लशीचा दुसरा डोस सोबत देण्यात आला. त्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा तिच्या आजोबांनी केला. त्यामुळे तिला चाळीसगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं. लस देण्यापूर्वी तिची प्रकृती उत्तर होती आणि खेळतही होती असा दावा कुटुंबीयांनी केलाय़. तर लस दिल्यानंतर सचिताला घरी नेलं. घरी गेल्यानंतर ती झोपली आणि त्यानंतर ती उठलीच नसल्याचा दावा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलाय.

आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणा ?

लस देण्यापूर्वी तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तिची प्राथमिक तपासणी केली होती का ?

अडीच महिन्यांच्या चिमुकलीला झेपेल असाच तो डोस होता का?

लसीकरणाच्या ठिकाणी आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर हजर होते का

मात्र सचिताच्या मृत्यूनंतरही आरोग्य यंत्रणांची क्रूरता थांबली नाही. या दुर्देवी घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावच्या जिल्हा रुग्णालयात नेलं. मात्र तिथे तर माणुसकी वेशीला टांगल्याचा अनुभव घरच्यांना आला. रात्री उशिरा मृतदेह आणला, म्हणून कर्मचाऱ्यांनी तो ताब्यात घेण्यास नकार दिला. रात्री शवविच्छेदन करू नका, मात्र किमान माणुसकी म्हणून मृतदेह शवपेटीत ठेवून घ्या असं आजोबांनी मोठ्या पोटतिडकीनं सांगितलं...मात्र जिल्हा रुग्णालयातल्या कर्माचाऱ्यांना जराही पाझर फुटला नाही. अखेर आपल्या अडीच महिन्यांच्या नातीचा गारठलेला मृतदेह रात्रभर मांडीवर घेऊन आजोबा तसेच बसून राहिले. शासकीय रुग्णालयाच्या आवारात माणुसकीचा थरकाप उडवणारे हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, पण 'सिस्टम' मात्र झोपलेली होती.

या घटनेतील आणखी एक क्लेशदायक बाब म्हणजे, चिमुकलीचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात कार्यरत असून सध्या अयोध्येत देशाची सेवा करत आहेत...ज्या बापाच्या खांद्यावर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, त्याच्या लेकीचा तर आरोग्य यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे बळी गेलाच..मात्र मृत्यूनंतरही तिची हेळसांड थांबली नाही. केवळ चौकशीचे आदेश देऊन हा विषय मिटणार नाही, तर या 'अमानवीय' कृत्यासाठी जबाबदार असणाऱ्या चाळीसगावपासून जळगावपर्यंत सर्व संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची

कडक कारवाई केली तरच सचिताला न्याय मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT