Hemant Parakh News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Businessman Kidnapping : उद्योगपती हेमंत पारख यांचं नाशिकमधून अपरहण, सूरतजवळ सुटका; मधल्या प्रवासात नेमकं काय झालं?

Nashik Crime News : छगन भुजबळ यांनी आज पारख कुटुंबियांची भेट घेतली.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

Nashik News :

नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचा त्यांच्या घराबाहेरुन अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्यांचा सूरतजवळ सुटका करण्यात आली आहे.

मात्र त्यांचं अपरहरण कुणी केलं? कशासाठी केलं? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. आरोपी कुठल्या राज्यातील होते याचा साधारण अंदाज आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भुजबळ यांनी आज पारख कुटुंबियांची भेट घेतली. (Crime News)

हेमंत पारख मोठे उद्योगपती आहेत. मुंबई, नाशिक सर्व ठिकाणी त्यांची कामे सुरू असतात. काल घराबाहेरहून त्यांचं अपहरण करण्यात आलं. सकाळी सुरतच्या रस्त्यावर जवळपास त्यांची सुटका झाली. मात्र मध्यंतरी काय झालं हे शोधणे पोलिसांचा काम आहे, असं छगन भुजबळ यांना सांगितलं. (Latest Marathi News)

धीर देण्यासाठी पारख कुटुंबाची भेट घेतली. आज घराजवळून नेलं तर उद्या घरातून देखील नेतील. यासंबंधी वरीष्ठ बोलीस अधिकऱ्यांशी बोलणार असल्याचंही छगन भुजबळ यांना सांगितलं. पारख यांचे डोळे बांधलेले होते, त्यामुळे अपहरणकर्ते कोण होते कळू शकलेलं नाही. पण कुठल्या राज्यातील हे लक्षात आलं आहे. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासोबत बोलणार असल्याचंही छगन भुजबळ यांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra News Live Update: गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा चाळीसगावात अपघात

Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday Horoscope: सुट्टीचा दिवस खर्चात जाणार, ५ राशींच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होणार; वाचा आजचे राशीभविष्य

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

SCROLL FOR NEXT