Indurikar Maharaj Saam Tv
महाराष्ट्र

Indurikar Maharaj News: इंदुरीकर महाराजांना प्रसार माध्यम अन् सोशल मीडियाची धास्ती? कार्यक्रमात मोबाईलसह कॅमेरावर बंदी

Indurikar Maharaj Kirtan Program Rules Change: गौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आता प्रसार माध्यमांची आणि सोशल मीडियाची धास्ती घेतलीय.

Shivani Tichkule

संजय सूर्यवंशी

Nanded News: गौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आता प्रसार माध्यमांची आणि सोशल मीडियाची धास्ती घेतलीय. नांदेड मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात इंदूरिकर महाराजांनी कार्यक्रमात चित्रीकरण करणारे कॅमेरे आणि मोबाईलवर बंदी घातली.  (Latest Marathi News)

आपल्या वानितील शब्द कुठल्याही कॅमेरात किंवा मोबाईलमध्ये टिपल्या जाऊ नये यासाठी इंदूरिकर महाराजांनी (Indurikar Maharaj) कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कॅमेरे आणि मोबाईलवर (Mobile) कार्यक्रमात बंदी घातली त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात केली.

इंदुरिकर महाराज कीर्तन करताना आपल्या शैलीतून अनेकांचा समाचार घेतात. सध्या गौतमी पाटील हिने आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात धुडगूस घातला आहे. इंदूरिकर महाराजांनी देखील एका कार्यक्रमात गौतमी पाटील हीचा समाचार घेत टीका केली होती.

गौतमी पाटील हे एका गाण्यासाठी तीन लाख रुपय घेते असे वक्तव्य इंदूरिकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला होता. महिला संघटनांनी या वक्तव्याचा निषेध करत इंदुरीकर महाराज महिला विरोधी असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती.

या प्रकारानंतर इंदुरिकर महाराज यांनी सावध भूमिका घेतली आहे. आपल्या कीर्तनातून बाहेर काही जाऊ नये म्हणून नांदेड (Nanded) येथील कार्यक्रमात त्यांनी मोबाईल आणि चित्रीकरण करणारे कॅमेरे हटविले आणि त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT