नाशिक - पोलीस मित्र असल्याची बतावणी करून एका फुकट्या भामट्याने चक्क हॉटेलमालकालाचं बोनेटवर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या इंदिरानगरमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेलमधील जेवणाच्या बिलाचे 1 हजार 600 रुपये देण्यास टाळाटाळ करत या भामट्याने आपण पोलीस मित्र असल्याचे सांगत हॉटेल मालकाला दमबाजी केली.
हे देखील पहा -
फुकट जेवणासाठी या कथित पोलीस मित्राने बिल देण्यास नकार देत थेट गाडीत बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित हॉटेल मालकाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, या कथित पोलीस मित्राने चक्क हॉटेल मालकाला बोनेटवर फरफटत नेलं. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.