Bhalchandra Nemade  Saam Tv
महाराष्ट्र

‘आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचं हे फळ’; भालचंद्र नेमाडेंचा संताप, पाहा नेमकं काय झालं?

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी सद्यस्थितीत चांगल्या माणसांनी राजकारणात पडू नये असे म्हणत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bhalchandra Nemade News : यशवंतराव चव्हाण पुरस्कार समितीत पुरस्कार देण्यात आलेल्या 'फ्रॅक्चर फ्रिडम' या पुस्तकावरुन सध्या शिंदे - फडणवीस सरकारवर चौफेर टिका केली जात आहे. यावर काही साहित्यकारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी सद्यस्थितीत चांगल्या माणसांनी राजकारणात पडू नये असे म्हणत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. ५० खोक्यांवरुन राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून गेले असताना जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "आपणच अशा हरामखोरांना निवडून देतो, त्याचेच हे फळ आहे," असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. जळगावमध्ये एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधतानान त्यांनी हे विधान केले आहे.

काय म्हणाले भालचंद्र नेमाडे?

"सद्यस्थितीत राजकारणात (Politics) चांगल्या लोकांनी पडू नये अशी परिस्थिती झाली असून सर्वसामान्य माणसांना खोक्याची भाषा चालते का ? दहा ते पंधरा टक्के लोकांचे व्यवस्थित चालले असून अनेकांना मात्र उद्या काय खावं याची काळजी असते. त्यामुळे अशा लोकांनी आता कोणाला निवडून द्यावं याचा विचार केला पाहिजे.

लोक जर असेच मूर्ख राहिले तर असलेच सरकार येत राहणार राष्ट्रवादामुळे आपल्या देशाचं नुकसान होत आहे. मुसलमानांपासून सर्वांनी या देशाला वर आणले आहे. पाकिस्तान चीनमध्ये अत्यंत गरीब लोक असून पाकिस्तानात गरीब स्त्रिया लहान मुलांना हातात घेऊन कामाला जातात युद्ध करायचं म्हणजे तुम्ही त्या स्त्रियांवर बॉम्ब टाकाल का?" असा प्रश्न भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच चिनी सरकार आपला शत्रू असेल पण चीन हा आपला शत्रू म्हणणे चुकीचे असून चिनी सैनिक आपल्याकडे येतात मारामाऱ्या करतात हे चुकीचे आहे. मात्र आपले ही सैनिक तेच करतात असेही पुढे बोलताना ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतानाच भाजपमधून ७६ बड्या नेत्यांची हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik Accident : भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला, विटांखाली दबून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

Pune Politics: जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच अजित पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपचं 'कमळ' घेणार हाती

Maharashtra Live News Update: नगर पालिके प्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत रायगडमध्ये महायुती तुटण्याचे खा. तटकरे यांचे संकेत

Virat Kohli: जगात भारी, विराट कोहली! ODI रँकिंगमध्ये पुन्हा नंबर १, रोहित शर्माची जागा घेतली

SCROLL FOR NEXT