Jawan Sandeep Gaikar Martyred Saam Tv
महाराष्ट्र

Indian Army Soldier Martyred : नगरचा भूमिपुत्र काश्मीरमध्ये शहीद; दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

Jawan Sandeep Gaikar : जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावत असताना युनिट-१५ मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकर यांना वीरमरण आले आहे. दहशतवाद्यांशी लढताना गायकर शहीद झाले आहेत.

Yash Shirke

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावातील संदीप पांडुरंग गायकर हे भारतीय सैन्यातील युनिट-१५ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये होते. सध्या १७ राष्ट्रीय रायफल जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत असताना सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी शहीद झाले आहेत. या बातमीमुळे त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावातील जवान संदीप पांडुरंग गायकर गेल्या सात वर्षांपासून सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. २१ मे रोजी रात्रीच्या सुमाराला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढताना त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली. सर्चऑपरेशन दरम्यान त्यांना वीरमरण आले.

संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. सैन्यात त्यांनी आपल्या निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि धैर्यानं सेवा बजावली. देशाच्या सुरक्षेसाठी उभ्या असताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच गावात शोककळा पसरली आहे. परवा (२४ मे) ब्राम्हणवाडा गावात संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत असताना अहिल्यानगरचे सुपुत्र जवान संदीप गायकर शहीद झाले आहेत. काल म्हणजेच २१ मे रोजी रात्री दहशतवाद्यांच्या विरोधात लढा देताना त्यांनी प्राणाची आहुती दिली. संदीप गायकर हे सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. देशाची सेवा करताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT