Jawan Suraj Yadav, Satara, Karad, Indian Army saam tv
महाराष्ट्र

Jawan Suraj Yadav News : जवान सूरज यादव यांचं निधन, येरवळे गावावर शाेककळा

दूरध्वनीवरून रात्री अकराच्या सुमारास गावाकडे ही माहिती मिळाली.

संभाजी थोरात

Jawan Suraj Yadav News : आसाम येथील दिमापूरमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र जवान सूरज मधुकर यादव (Jawan Suraj Yadav) यांचे निधन झालं. ते भारतीय लष्कराच्या सेवेत होते. त्यांच्या निधनाने येरवळे (yervale) गावावर शोककळा पसरली आहे. आज (बुधवार) त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. (Maharashtra News)

सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरा गावाकडे समजताच गावातील वातावरण सुन्न झाले आहे. ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव विमानाने आज (बुधवारी) पुण्यात त्यानंतर (Satara) गावाकडे आणले जाणार आहे.

सूरज यादव २००७-०८ दरम्यान भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. काही वर्षे त्‍यांनी पुण्यात सेवा बजावली. तद्नंतर तीन महिने बरेली (उत्तर प्रदेश) येथून पुढे नागालँड (आसाम) याठिकाणी १११ इंजिनिअर रेंजमेंट विभागात ते कार्यरत होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Famous Actress Death: मराठी मनोरंजन विश्वाला आणखी मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

Maharashtra News Live Update: भाजपमध्ये जुन्यांना येणार पुन्हा अच्छे दिन

CPR During Heart Attack: हार्ट अटॅक आला की सीपीआर कधी द्यायचा? जीव वाचवण्यासाठी योग्य मार्ग लक्षात ठेवा

Mosquito : घराच्या प्रत्येक कोपऱ्यात डास? ना कॉइल, ना स्प्रे! मच्छर-माशा पळवण्यासाठी वापरा 'हा' ९९% देसी उपाय

SCROLL FOR NEXT