Monsoon 2026 Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon 2026: पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं, महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज

India Monsoon Forecast 2026: पावसाने देशातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं आहे. देशात यंदा सरासरीपेक्षा ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार हे जाणून घ्या....

Priya More

Summary -

  • भारतीय हवामान खात्याने आज मान्सूनबाबतचा पहिला अंदाज वर्तवला

  • २०२६ मध्ये ९२ टक्के पावसाचा अंदाज

  • देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

  • महाराष्ट्रातही पाऊस कमी पडणार

देशातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं आहे. हवामान विभागाने आज नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ९२ टक्के पाऊस पडू शकतो. म्हणजेच यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा देशामध्ये सरासरीपेक्षा ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जेव्हा हवामान विभाग ९० ते ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवतो तेव्हा देशात पाऊस कमी पडण्याचा अंदाज असतो. यावर्षी ९२ टक्के पाऊसाचा अंदाज आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे. यावर्षी मान्सूनवर एल नीनोचा प्रभाव दिसू शकतो. त्यामुळे पाऊस कमी पडू शकतो आणि तीव्र उष्णता जाणवू शकते.

एप्रिल ते जून या कालावधीमध्ये एल नीनो-दक्षिणी दोलन तटस्थ स्थितीत राहण्याची शक्यता आहे. जूननंतर मान्सून हंगामामध्ये अल नीनोची तीव्र स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जूननंतर मान्सून काहीसा कमकुवत राहू शकतो. यामुळे देशात पाऊस कमी पडू शकतो. एप्रिल ते जून या कालावधीत परिस्थिती सामान्य राहील. पण त्यानंतर मान्सूनदरम्यान अल नीनो सक्रिय होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात देखील सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ याठिकाणी सामान्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आला आहे. तर ईशान्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागांमध्ये यंदा सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महत्वाचे म्हणजे दक्षिण-पश्चिम मान्सूनसाठी यंदा अनुकूल परिस्थिती असून मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप नगरसेवकांचा अधिकाऱ्यांना घरचा आहेर

Supreme Court : पॅकेटबंद खाद्यपदार्थबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, पॅकेटवर येणार वेगवेगळे वॉर्निंग लेबल

Kidney Damage Causes: किडनीला हळूहळू खराब करतात या रोजच्या ७ सवयी; आजच करा बदल, अन्यथा वाढू शकतो धोका

Government Employees : सर्वसामान्यांची कामे रखडवली तर सरकारी कर्मचाऱ्यांना २५ हजारांचा दंड, सरकारचा मोठा निर्णय

IAS-IPS Officer Transfer: मोठी बातमी! 12 IAS आणि 18 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT