nagpur ebola Saam tv
महाराष्ट्र

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

nagpur ebola : नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट...आफ्रिकी देश युगांडातून नागपुरात परतलेल्या एका नागरिकाला तब्बल २१ दिवस होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय.

Saam Tv

पराग ढोबळे, साम टीव्ही

आफ्रिकी देशांमध्ये पुन्हा एकदा इबोलाचा धोकादायक विषाणू डोके वर काढताना दिसतोय. विशेषतः युगांडामध्ये “बुन्डिबुग्यो” स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारनं देशभरात अलर्ट जारी केलाय. त्यामुळे आफ्रिकी देशात जण टाळावे, किंवा त्या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाश्यांचा बाबतीत विशेष काळजी घेण्याचा सूचना आहे.

सध्या संबंधित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं नसल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय...तसंच त्या व्यक्तीचा कोणत्याही इबोला रुग्णाशी संपर्कही आला नसल्याची माहिती आहे...मात्र इबोलाचा संसर्ग अत्यंत वेगानं पसरू शकतो, त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून सतत मॉनिटरिंग केलं जाणार आहे...

इबोला हा “व्हायरल हॅमरेजिक फीव्हर” प्रकारातील अत्यंत घातक आजार मानला जातो.या आजारात रुग्णाला ताप, अशक्तपणा, उलट्या, रक्तस्राव अशी गंभीर लक्षणं दिसतात. मृत्यूदरही मोठा असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनं याकडे गंभीरतेनं पाहायला सुरुवात केलीय.

विशेष म्हणजे सध्या चर्चेत असलेल्या “बुन्डिबुग्यो” स्ट्रेनवर अद्याप ठोस लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातंय... त्यामुळे केंद्र सरकारनं नागरिकांना आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय...

दरम्यान संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी नागपूर मेडिकल प्रशासनही सज्ज झालंय...संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येतोय...तसंच आवश्यक औषधं, सुरक्षा उपकरणं आणि डॉक्टरांची विशेष टीमही तयार ठेवण्यात आलीय.

कोरोनानंतर आता इबोलाच्या धोक्यानं आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झालीय. सध्या नागपुरात कोणताही इबोला रुग्ण आढळलेला नसला तरी प्रशासन “प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर” या भूमिकेत दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT