Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu : शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी; बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Eknath Shinde) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Eknath Shinde) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता शिंगेला पोहचला आहे. रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे येत्या १ नोव्हेंबरपर्यंत द्यावेत. त्यांनी पुरावे न दिल्यास वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

इतकंच नाही तर माझ्यासोबत १२ आमदार आहे. असा इशारा सुद्धा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. किराणा वाटपावरून बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर टीका केल्यानंतर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. इतकंच नाही तर, गुवाहाटीला जाऊन बच्चू कडू यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोपही राणांनी केला. (Political News)

रवी राणा यांच्या या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झालेत. रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे दिले तर त्यांच्या घरी भांडी घासेन, असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. बच्चू कडूंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रवी राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हाही दाखल केला. मात्र आता बच्चू कडू यांनी थेट शिंदे फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

येत्या १ तारखेपर्यंत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत. जर एका बापाची औलाद असेल, तर तो पुरावे देईल. जर नाही दिले तर त्याच्या (रवी राणा) नावाची आम्ही घोषणा करणार, मला काही आमदारांचे फोन आले, त्यांच्याही अस्तित्वाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधक 50 खोके बोलत होते तिथपर्यंत ठीक होते. पण आमच्यातीलच माणसं असं बोलले तर खोके घेऊन शिंदे यांच्यासोबत गेलो असा प्रचार होत आहे. त्यामुळे 1 तारखेला आम्ही आमच्यासोबत असलेले 12 आमदार निर्णय घेणार आहोत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT