मनसे-भाजप-शिंदे गट महायुती लवकरच? महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीत मनसेचं स्वागत असेल असं म्हटलं आहे.
Radhakrushn Vikhe PAtil-Raj Thackeray
Radhakrushn Vikhe PAtil-Raj ThackeraySaam TV
Published On

>> सचिन बनसोडे

शिर्डी : दिवाळीत शिवाजी पार्कातील दीपोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर दिसले. हे व्यासपीठ राजकीय नव्हते मात्र त्यानंतर सुरु झालेली चर्चा आता महायुतीकडे वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या आहे. मनसे, भाजप, शिंदे गटातील अनेक नेत्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीत मनसेचं स्वागत असेल असं म्हटलं आहे.

Radhakrushn Vikhe PAtil-Raj Thackeray
'आमदार सांभाळणं सोप्प नाही; दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार'

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

शिंदे फडणवीस सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने या सरकारचा जनाधार वाढत आहे. या युतीत मनसे येत असेल तर दिलसे स्वागत करायला आम्ही तयार असल्याचे सूचक वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. (Political News Update)

Radhakrushn Vikhe PAtil-Raj Thackeray
देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले, उत्तराच्या लायक...

शिंदे फडणवीस सरकार हे लोकांसाठी काम करून निर्णय घेत आहे. महायुतीत कोणाला घ्यायचे याचा सर्वस्वी अधिकार पक्षश्रेष्ठींचा असून राजसाहेब ठाकरे यांच्या विकासाच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच केले आहे. जनाधार लाभलेल्या या युतीत जर मनसे सहभागी होत असेल तर त्यांचे दिलसे स्वागतच करू, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com