Bacchu Kadu News Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu : बंडखोरी करणाऱ्यांनाच यश मिळतं; निकाल शिंदेंच्याच बाजूने लागणार, बच्चू कडू काय म्हणाले?

बंडखोरी करणाऱ्यांनाच यश मिळतं हा इतिहास आहे. आजपर्यंत ज्यांनी बंडखोरी केली ते मुख्यमंत्री झाले. जे निष्ठावंत आहे त्यांच्या पदरी निराशा पडते, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Bacchu Kadu News : बंडखोरी करणाऱ्यांनाच यश मिळतं हा इतिहास आहे. आजपर्यंत ज्यांनी बंडखोरी केली ते मुख्यमंत्री झाले. जे निष्ठावंत आहे त्यांच्या पदरी निराशा पडते, असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आगामी काळात शिंदे-भाजप सरकारसोबत युती झाली तर ठिक नाहीतर, १५ अपक्ष जागा लढवणार असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi News)

शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. जर नाही झाला तर तो 2024 नंतरच होईल, असंही बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

मला दिव्यांग मंत्रयालय दिलं त्यामुळं मी नाराज नाही, माझी बंडखोरीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. राज्यपालांच्या शपथविधी साठी पत्रिका छापल्या, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली. अनेक आमदारांना वाटलं आपण मंत्री होणार असं वाटू लागलं आहे. मंत्रीमंडळात 20-30 मंत्र्यांचाच समावेश केला जाईल, असं केले जातील. मात्र, 100 जण रांगेत आहेत. त्यामुळं नाराजी, कुजबुज सुरू आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

'निकाल शिंदे साहेबांच्या बाजूनेच लागणार'

बंडखोरी करणाऱ्यांनाच यश मिळतं हा इतिहास आहे. आजपर्यंत ज्यांनी बंडखोरी केली ते मुख्यमंत्री झाले. जे निष्ठावंत आहे त्यांच्या पदरी निराशा पडते, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलताना सुप्रीम कोर्टात निकाल शिंदे साहेबांच्याच बाजूने लागेल, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला.

'आगामी विधानसभेत १५ जागा लढवणार'

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसह राज्यातील विधानसभा निवडणुका होतील, असा कयास बांधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सांगितले असून, किती जागांवर उमेदवार देणार, याचा आकडा बच्चू कडू यांनी सांगितला आहे.

भाजप – शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच. अन्यथा १५ विधानसभा जागा लढवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. युतीसाठी आग्रह करु, पण, युती नाही तर स्वतंत्र लढणार असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच विस्तार केल्यावर भूकंप होईल, अशी स्थिती नाही. विस्तार झाल्यावर कुणी बाहेर जाणार नाही. उलट इकडेच येतील, असं मोठं विधानही बच्चू कडू यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT