Mla Bacchu Kadu Accident News : Saam Tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu Accident: आमदार बच्चू कडूंचा अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू

अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mla Bacchu Kadu Accident News : अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला असल्याची माहिती आहे. रस्ता क्रॉस करताना त्यांना दुचाकीने धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Bacchu Kadu Latest News)

प्राप्त माहितीनुसार, अपघातात आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

आज म्हणजेच बुधवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बच्चू कडू हे डिव्हायडरच्या दिशेने फेकले गेले.

दरम्यान, अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपली प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवल्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेतून बाहेर पडले होते. सध्या बच्चू कडू मंत्रिपदापासून उपेक्षित आहेत. ते शिंदे-फडणवीस सरकारच्या सोबत असले तरी अधून मधून त्यांची नाराजी समोर येत असते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपा विषारी सापासारखा, त्याला मारून टाका; मल्लिकार्जुन खरगे यांची जहरी टीका

Beed Politics : बीडचं राजकारणच वेगळं; मुलाच्या विरोधात प्रचारासाठी वडील उतरले मैदानात

VIDEO : 'एक मैं और एक तू... ', जेव्हा अमित ठाकरे गाणं गातात | Marathi News

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

SCROLL FOR NEXT