Mumbai News: भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट (15 th August) रोजी साजरा केला जातो. येत्या मंगळवारी भारताचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day) साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारकडून (Shinde-Fadnavis Government) देखील जय्यत तयारी केली जाते.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. पण यावर्षी ध्वजारोहणासाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे कोण- कोणत्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करणा असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता शिंदे-फडणवीस सरकारने तोंडगा काढला आहे. सरकारकडून ध्वजारोहण करणाऱ्या मंत्री आणि नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांचा वाद टाळण्यासाठी राज्य सरकारने ध्वजारोहणाबाबत तोडगा काढला आहे. त्यांनीच ध्वजारोहणासाठी नावं जाहीर केली आहेत. राज्य सरकारने काही जिल्हे आणि त्याठिकाणी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्री आणि नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये काही जिल्ह्यांची नावं नाहीत. अशामध्ये ज्या जिल्ह्यांची नावं नाहीत त्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल असे देखील सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
15 ऑगस्टला कोण आणि कोणत्या जिल्ह्यात करणार ध्वजारोहण?
- देवेंद्र फडणवीस - नागपूर
- अजित पवार - कोल्हापूर
- छगन भुजबळ - अमरावती
- सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर
- चंद्रकांत पाटील - पुणे
- दिलीप वळसे पाटील - वाशिम
- राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर
- गिरीश महाजन - नाशिक
- दादा भुसे - धुळे
- गुलाबराव पाटील - जळगाव
- रविंद्र चव्हाण - ठाणे
- हसन मुश्रीफ - सोलापूर
- दीपक केसरकर - सिंधुदुर्ग
- उदय सामंत - रत्नागिरी
- अतुल सावे - परभणी
- संदीपान भुमरे - औरंगाबाद
- सुरेश खाडे - सांगली
- विजयकुमार गावित - नंदुरबार
- तानाजी सावंत - उस्मानाबाद
- शंभूराज देसाई - सातारा
- अब्दुल सत्तार - जालना
- संजय राठोड - यवतमाळ
- धनंजय मुंडे - बीड
- धर्मराव आत्राम - गडचिरोली
- मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर
- संजय बनसोडे - लातूर
- अनिल पाटील - बुलडाणा
- आदिती तटकरे - पालघर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.