अकोल्यात रात्रीची संचारबंदी वाढवली; आता 23 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी
अकोल्यात रात्रीची संचारबंदी वाढवली; आता 23 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात रात्रीची संचारबंदी वाढवली; आता 23 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी

जयेश गावंडे

अकोला : अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात कलम 144 जारी करण्यात आले असून 23 नोव्हेंबर रात्रीची संचारबंदी वाढवण्यात आली आहे. ही संचारबंदी रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज निर्गमित केले.

हे देखील पहा :

आदेशात दि.२३ रोजी पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दि. २३ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकालावधीत आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र सुरु राहतील. तसेच या कालावधीत धार्मिक तेढ वाढविणारे, भावना भडकविणारे असे कृत्य, वक्तव्य, अफवा पसरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

समाज माध्यमांद्वारे असे संदेश प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे रॅली, धरणे, मोर्चे व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही. निवडणूक प्रचार संबंधित कार्यक्रम असल्यास त्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toyota Cars: मोठ्या फॅमिली साठी बेस्ट आहे ही कार, Toyota Rumion भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

SCROLL FOR NEXT