Vegetables Rates yandex
महाराष्ट्र

Vegetables Rates : कांदा, लसूण ते मेथी; भाजीपालाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Vegetable Price Hike: भाजीपालाच्या दरात वाढ झाल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची झुंबड उडाली आहे. या कारणामुळे मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात आगामी निवडणूका तोंडावर भाज्यांचे भाव वाढत आहे आणि ही महागाई शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरु शकते. दिवाळीनिमित्त कमी झालेल्या फळांचे आणि पालेभाज्यांचे दर आता वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. नवीन कांद्यांचे दर वाढले असून जुन्या कांद्याच्या विक्रीत वाढ झाल्याने कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. हिवाळ्यात येणारा वाटाणा १६०-२०० रुपये किलो झाला आहे. ही भाववाढ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास मदत करु शकतात, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थैर्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मागच्या आठवड्यात बाजार समितीमध्ये कांद्याचा दर १८ ते ४८ रुपये किलो दरम्यान होता. आता तोच कांद्याचा दर ३५-६२ रुपये किलोवर पोहोचला आहे. किरकोळ बाजाात कांदा ७५-८० रुपये दराने विकला जात आहे. तसेच लसूण बाजारात ३५०-४०० रुपये दराने विकला जात आहे. त्याचप्रमाणे मेथीची जुडी बाजारात ३० रुपये किलो दराने विकली जात असून या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो. हिवाळ्यात लोकप्रिय असलेल्या भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगांचा दर बाजारात १३० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

या भाववाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो, यासाठी त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेक लोकं गावी जातात त्यामुळे शहरातील गर्दी कमी होते. याच कारणामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांची विक्री होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी होतो. दिवाळीची सुट्टी संपल्यावर सगळे पुन्हा शहरात येतात आणि या वाढत्या गर्दीमुळे पुन्हा भाज्यांचे दर वाढले आहेत. दिवाळीमध्ये असलेल्या दरापेक्षा आता १०-२० रुपये किलोने दर वाढले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहेत.

सध्या बाजारात फळभाजी आणि पालेभाज्यांची आवक होत असते. दरम्यान, फळबाजारामध्ये पेरुचे दर वाढले आहेत मात्र, देशी सफरचंदाचे दर आटोक्यात आहेत. धान्यबाजारामध्ये डाळीच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तसेच आता हे सर्व सणानंतर आता फुलांच्याही दरात घसरण झाली आहे. मात्र, आता लग्नसराईचा थाट सुरु झाल्यानंतर फूलबाजाराला तेजी येणार आहे. सध्या झेंडू, शेवंती आणि अष्टर या फुलांची किंमत १००-१२० रुपये किलो दराने आहे, तर गुलाब २५०-३०० रुपये किलो आहे.

Written By: Dhanshri Shintre.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT