income tax department raids angadia service office in akola  Saam Digital
महाराष्ट्र

IT Raid in Akola : अकाेल्यात आंगडिया कार्यालयावर 'आयकर'ची धाड; नांदेडच्या 'त्या' कारवाईचे धागेदोरे?

Akola Latest Marathi News : या तपासणीमूळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. याचे नांदेडच्या त्या कारवाईशी धागेदारे उलगडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Siddharth Latkar

अक्षय गवळी

अकोला येथील कोठडी बाजारातील एका आंगडीया कुरियर सर्व्हिसच्या कार्यालयात आयकर विभागाने आज (बुधवार) छापा टाकला. सकाळपासून आयकर विभागाच्या पथकाकडून कुरियरच्या कार्यालयातील कागपदत्रांची तपासणी सुरु आहे. केल्या जात आहे. या कार्यालयातील तपासणीचे नांदेडमध्ये झालेल्या आयकर धाडीशी कनेक्शन असल्याची माहिती कळत आहे. (Maharashtra News)

कुरियरच्या माध्यमातून मोठ्या रकमांचा व्यवहार झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळेच ही तपासणी सुरू असल्याचे समजते. या छाप्याबाबत मोठी गोपनियता बाळगण्यात आली आहे. अद्याप काेणीही या तपासणीत नेमकं काय काय केले जात आहे याची अधिकृत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलेलं नाही. दरम्यान अकाेला येथील आणखी काही कुरियर कंपन्यांवर आयकर विभाग धाड टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान नांदेडमध्ये असलेल्या संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता अकोल्यात आयकर विभागाकडून अकोल्यातल्या कोठडी बाजारातील एका कुरियर सर्व्हिसवर धाडी टाकत तपासणी केली जात असल्याने तसेच आयकर विभागाची दाेन वाहने रस्त्यावर उभी असल्याने बाजारपेठेत चर्चा सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

...तर कारवाई हाेणार

नागपुर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी मोहीम सूरू आहे. दरम्यान आयकर विभागाच्या दरवर्षी तपासणी मोहीम सुरू असते, मागीलवर्षी देखील काही उद्योजक, व्यापारी तसेच कोचिंग क्लासेसवर देखील तपासणी केली होती. तपासणी मोहीम नंतर काही त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावर कारवाया केल्या जातात.

आजच्या आंगडीया कुरियर सर्व्हिसवर तपासणी सुरू असून काही त्रुटया आढल्यास पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यत बारकाईने ही कुरियर सर्व्हिसवर बंददाराड़ ही तपासणी सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT