solapur, Income Tax Department
solapur, Income Tax Department saam tv
महाराष्ट्र

IT Department : साेलापुरातील 'इन्कम टॅक्स' च्या छाप्याने महाराष्ट्रातील व्यापारी चिंतेत; 50 काेटींचा घाेटाळा

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात आयकर विभागाने विविध व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये जवळपास पन्नास कोटी रुपयांचे बोगस व्यवहार आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. साेलापूर (solapur) येथील छाप्यांमुळे महाराष्ट्रातील विशिष्ट व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

आयकर विभागाचे अधिकारी बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांची सखाेल चाैकशी करीत आहेत. सोलापुरातील आसरा चौक कुमठा नाका हैदराबाद रोड परिसरामध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत. (Breaking Marathi News)

गत चार दिवसांत आयकर विभागाने (income tax department) टाकलेल्या छाप्यात सुमारे पन्नास काेटी रुपयांचे बाेगर व्यवहार दाखविण्यात आल्याचे समाेर आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आली आहे असेही सूत्रांकडून समजते.

भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. मुळगाव रोड येथील एका कत्तलखाना चालवणाऱ्या कंपनीवरही छापे टाकण्यात आले आहेत. तसेच मुंबई (mumbai), कोल्हापूरसह विविध कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule Meets Chhagan Bhujbal : बावनकुळे, भुजबळांमध्ये भेट! कारण काय?

FACT CHECK: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल! कोल्हापूरमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य नेमकं काय?

Special Report : पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी नवा गेम प्लॅन

Today's Marathi News Live : मोदींनी दहा वर्षात काय केलं ते सांगाव; नाना पटोले यांची टीका

Special Report : 'ठाकरेंकडून संभाजीराजेंचा अपमान', व्हिडीओ दाखवत Uday Samant यांचा दावा

SCROLL FOR NEXT