Nagpur News
Nagpur News saam tv
महाराष्ट्र

नागपुरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - एकीकडे महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाचे दावे केले जात असले तरी खरंच महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. कारण नागपुरात (Nagpur) महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या प्रेमसंबंधातून होत असल्याचा दावा पोलिसांकडून (Police) करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीही राज्यात सर्वाधिक महिला अत्याचारात नागपूर पुढे असल्याचे दिसून आले आहे.

हे देखील पाहा -

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ६८ गुन्हे पोलिसांनी दाखल करुन घेतले होते. तसेच या वर्षी पाच महिन्यातच 88 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात बलात्कार, विनयभंग, सासरच्या मंडळी कडून अत्याचार यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यांची सर्वाधिक संख्या आहे. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करते. मात्र, तरीही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होते आहे. त्यामुळं शहरातील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT