gopichand padalkar saam tv
महाराष्ट्र

Sangli: अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या दिशेनं हजाराे धनगरांसह गोपीचंद पडळकर रवाना

आज सांगली शहरात तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

विजय पाटील

सांगली : अहिल्यादेवी होळकर (ahilyabai holkar) यांच्या स्मारकाचे लोकार्पण आज (रविवार) मेंढपाळांच्या हस्ते करण्याचा निर्धार भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी केला आहे. त्यादृष्टीने आज पडळकर हजाराे धनगर समाजातील कार्यकर्त्यांसह (sangli) स्मारकाकडे रवाना झाले आहेत. (sangli latest marathi updates)

या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी विश्रामगृह येथे धनगर समाजातील शेकडाे कार्यकर्ते सूतगिरणी परिसरात जाण्यासाठी जमले हाेते. त्यापुर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोलवादान करत गजी नृत्य करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

यानंतर आमदार पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले खरं आहे आत्ता माझा (नृत्य) घाम निघाला आहे. आता तिकडच्या लाेकांचा घाम काढण्यासाठी आम्ही निघत आहाेत. या स्मारकाचे लाेकार्पण शांततेत करणार आहाेत. प्रशासनाने कार्यक्रमात गालबाेट लावण्याचे काम करु नये. आम्ही चुकीचे काही करीत नाही. पाेलिसांचे देखील आम्हांला मूकसमर्थन आहे असेही पडळकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT