Nandurbar News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar News: व्हाट्सअ‍ॅपच्या युगात पोस्ट कार्डच्या माध्यमातून 750 विद्यार्थिनींनी लिहिली बाबांना पत्र

आजच्या इंटरनेटच्या युगात आपण आपल्या जुन्या गोष्टी विसरलो आहोत.

Shivani Tichkule

सागर निकवाडे

Nandurbar News Today: आजच्या इंटरनेटच्या युगात आपण आपल्या जुन्या गोष्टी विसरलो आहोत. व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांना संदेश पोहोचवत आहोत. मात्र जुन्या काळात लोक पत्रांद्वारे आपल्या भावना आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवत होते. (Latest Marathi News)

मात्र आजच्या आधुनिक युगात आपण पूर्वीच्या संदेश वाहनाचे पद्धत विसरलो आहोत. याच गोष्टींची आठवण करून देण्यासाठी नंदुरबार शहरातील डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल आणि लायन्स क्लब यांचा संयुक्त विद्यमाने एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवला आहे.

आजच्या सोशल मीडियाच्या (Social Media) युगात आपण आपल्या आई वडिलांपासून लांब झालोय की काय याच भावना लक्षात घेऊन नंदुरबार (Nandurbar) शहरातील डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलने बाबांना पत्र हा अनोखा उपक्रम राबवला आहे.

आपण आईला पत्र लिहितो आईबद्दल भावना व्यक्त करतो आणि त्यात आपले बाबा कुठेतरी राहून जातात की काय वाटायला लागतं. आपल्याच माणसांबद्दल आपण समोर बोलू शकत नाही आणि त्याच वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी 750 विद्यार्थिनींनी आपल्या वडिलांना पत्र लिहिले आहे.

मुलांना आजकाल पत्र, पोस्टकार्ड असो त्यांची माहितीच राहिलेली नाही. शाळेत अनेक मुली आहेत की ज्यांना पत्र कसे लिहायचं हे देखील माहित नव्हतं. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी त्यांना पत्राची माहिती दिली.

आज प्रत्येक जण सोशल मीडियाचा आहारी गेला असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलमध्ये बंदिस्त झाले आहोत. मात्र या उपक्रमाद्वारे या पत्राची ओळख नव्याने या विद्यार्थिनींना झाली आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी हे पत्र पहिल्यांदाच बघत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT